![]() |
डॉ. व्ही. कांदावेलोव, आयएएसअध्यक्ष
डॉ. व्ही. कांदावेलोव, आयएएस हे एजीएमयूटी (AGMUT) संवर्गच्या (कॅडर) 1997 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी पशुवैद्यकीय विज्ञानात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे आणि दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आहे.
डॉ. कांदावेलोव, आयएएस यांची 21.06.2022 रोजी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. सध्या ते गोवा सरकारमध्ये प्रधान सचिव (वित्त) म्हणून कार्यरत आहेत, आणि उद्योग, बंदर, नियोजन व सांख्यिकी इ. खात्यांचे काम पाहतात. राज्यातील मुख्य प्रशिक्षण संस्था असलेल्या गोवा सार्वजनिक प्रशासन व ग्रामीण विकास संस्थेचेही ते महासंचालक आहेत.
डॉ. कांदावेलोव, आयएएस यांनी नेदरलँड्स येथे सार्वजनिक धोरण या विषयातील एक वर्षीय पदव्युत्तर पदवीचा कार्यक्रम पूर्ण केला आहे. त्यांना राज्याच्या स्टार्टअप क्रमवारी 2019 मध्ये अंदमान व निकोबार बेटांवर स्टार्टअप्सच्या प्रसार व पाठिंब्यासाठी प्रशंसा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. 2016 च्या पुड्डुचेरी राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये, मतदार शिक्षण व जागृतीसाठी प्रभावशाली भागीदारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने, 2020 साली भारत निवडणूक आयोगाने त्यांना एसव्हीईईपी (SVEEP) अंतर्गत लोकसहभागासाठी शाश्वत मोहिमेकरिता राज्यांना उत्कृष्टतेसाठीचा सर्वोत्कृष्ट मतदान पद्धती पुरस्कार प्रदान केला.
|
![]() |
श्री. नारायण सावंत, आयएएस (निवृत्त)आयोग सदस्य
श्री. नारायण रामा सावंत, आयएएस (निवृत्त), हे 2013 च्या एजीएमयूटी (ऍग्मू) कॅडरचे अधिकारी आहेत. विज्ञान शाखेतील पदवीधर असलेले श्री. सावंत यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. श्री. सावंत यांच्याकडे कायदा व बी.एड. पदवी देखील आहे. त्यांच्याकडे प्रतिष्ठित गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका आहे आणि सिम्बायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (एसडीसीएल) पुणे येथील सायबर लॉ वरील व्यवस्थापन यामधील प्रमाणपत्र अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला आहे..
श्री. सावंत हे 1998 मध्ये गोवा लोकसेवा आयोगाच्या पहिल्या तुकडीचे अधिकारी म्हणून राज्य नागरी सेवा अधिकारी या पदावर रुजू झाले. त्यांनी महसूल विभागाच्या क्षेत्र कार्यालयांमध्ये उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. पंचायत संचालनालय, दक्षता संचालनालय, जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरण (आरडीए), दक्षिण, सहकारी संस्था इ. अशा अनेक खात्यांचे त्यांनी नेतृत्व केले आहे. ते अतिरिक्त सचिव (गृह) आणि अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत होते.
त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदाधिष्ठित करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी अधिकारी म्हणून बढती मिळाली. ते राज्य प्रशासनातून कला व संस्कृती सचिव म्हणून निवृत्त झाले. श्री. सावंत 10 फेब्रुवारी 2025 रोजी आयोगाचे सदस्य म्हणून रुजू झाले आहेत.
|