Menu Close

माजी सदस्य

माजी सदस्य

श्री. दौलत हवालदार, आयएएस (निवृत्त)

सदस्य

श्री. दौलत आनंदराव हवालदार, आयएएस (निवृत्त) हे एजीएमयूटी (AGMUT) संवर्गच्या (कॅडर) 2003 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून औद्योगिक मानसशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी मुंबई येथील राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था आणि बँकिंग संस्था येथे संक्षिप्त कार्यकाळासाठी सेवा बजावली आहे

राज्य प्रशासनात श्री. हवालदार यांनी रोजगार, नागरी पुरवठा, वाहतूक, नगरपालिका प्रशासन इ. विविध खात्यांचे प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांनी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. अरुणाचल प्रदेशात, ते वाहतूक सचिव व वित्त सचिव होते, त्या काळात त्यांना 26 जानेवारी 2016 रोजी सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. गोव्यात परतल्यानंतर ते बराच काळ आयुक्त व सचिव (वित्त) म्हणून कार्यरत होते. 30.09.2020 रोजी ते राज्य प्रशासनातून निवृत्त झाले.

1985 मध्ये यूपीएससीद्वारे त्यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली व त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवेत निवड झाली, तथापि, गोवा घटक राज्य बनण्यापूर्वी, ते 1988 मध्ये यूपीएससीच्या शेवटच्या बॅचचे गोवा नागरी सेवा अधिकारी म्हणून स्थायिक झाले. श्री. हवालदार, हे दिनांक 03.02.2020 रोजी आयोगाचे सदस्य म्हणून रुजू झाले आणि 02.02.2025 रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला.

श्री. मिनीन डिसौझा, आयएऍस(निवृत्)

सदस्य

श्री. मिनीनो डिसोझा, आयएएस(निवृत्त), हे आयएएसच्या एजीएमयूटी (AGMUT) संवर्गच्या (कॅडर) 2011 च्या बॅचचे अधिकारी म्हणून निवृत्त झाले. ते विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत, श्री. डिसोझा 1998 मध्ये, गोवा लोकसेवा आयोगाच्या पहिल्या बॅचचे अधिकारी म्हणून राज्य नागरी सेवेत रुजू झाले..

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकारी म्हणून संक्षिप्त कार्यकाळानंतर त्यांना वरिष्ठ श्रेणी अधिकारी म्हणून बढती मिळाली. त्यांनी राज्य प्रशासनात, प्रकल्प संचालक डीआरडीए दक्षिण, पंचायत संचालक, अबकारी आयुक्त, पर्यटन संचालक इ. अशा विविध खात्यांचे प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांनी गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, उद्योग संचालक इ. पदांचाही कार्यभार सांभाळला आहे.

त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी अबकारी खात्यातील प्रक्रियेचे मोठ्या प्रमाणावर डिजिटलायझेशन केले आहे.श्री. डिसोझा यांची आयएएसमध्ये निवड झाली आणि त्यानंतर, ते पंचायत, आरडीए, कला व संस्कृती इ. मध्ये सचिव म्हणून कार्यभार सांभाळला आहे. ते 03/02/2020 रोजी गोवा कर्मचारी निवड आयोगाचे सदस्य म्हणून रुजू झाले आणि 02.02.2025 रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला.
गोवा कर्मचारी निवड आयोग​
नामोः
गोवा कर्मचारी निवड आयोग,
गोवा कर्मचारी निवड आयोग,
6वा मजला,तिसरी लिफ्ट, स्पेसेस इमारत,
पाटो प्लाझा, पणजी, गोवा.
फोन: 0832-2437260 ईमेल: us[dot]gssc[at]goa[dot]gov[dot]in
द्वारा: माहिती तंत्रज्ञान महामंडळ [गोपनीयता धोरण] [ सर्वाधिकार ][सायट मॅप] [अटी] [अस्वीकरण]
visitor counter
Skip to content