कार्ये
(1) आयोग परीक्षा घेईल आणि अधोश्रेणी सेवा/पदांवर नियुक्ती करण्यासाठी उमेदवारांची निवड करेल.
(2) आयोग, सरकार अधिसूचनेद्वारे निर्दिष्ट करेल अशी इतर कार्ये आणि कर्तव्ये पार पाडेल.
(3) आयोग खात्याच्या परीक्षा घेईल आणि सरकारद्वारे त्यांना संदर्भित केलेल्या अशा इतर बाबींवर सरकारला सल्ला देईल.
(4) अधोश्रेणी सेवा/पदांशी संबंधित कोणताही कायदा व नियम, विनियम किंवा त्याखाली तयार केलेल्या उप-विधी आणि सेवा अटींमध्ये काहीही समाविष्ट असले तरीही, अशा अधोश्रेणी सेवा/पदांवर नियुक्ती करण्यासाठी परीक्षा घेण्यास आयोग सक्षम प्राधिकरण असेल.
(5) भरती पद्धतींशी संबंधित सर्व बाबींवर, किंवा अधोश्रेणी सेवा/पदांशी संबंधित इतर कोणत्याही बाबींवर, सरकारी खात्याद्वारे त्यांना संदर्भित केलेल्या कोणत्याही बाबींवर सल्ला देणे हे आयोगाचे कर्तव्य असेल.
(6) सरकार मात्र, ज्या प्रकरणांमध्ये सर्वसाधारणपणे किंवा कोणत्याही विशिष्ट वर्गाच्या प्रकरणांमध्ये किंवा कोणत्याही विशिष्ट परिस्थितीत, आयोगाचा सल्ला घेणे आवश्यक नाही अशा बाबी निर्दिष्ट करणारे आदेश काढू शकते.
(7) आयोग व सरकारी खाते यांच्यात कोणत्याही विषयावर मतभेद असल्यास, संबंधित सरकारी खाते अशी बाब सरकारकडे पाठवेल आणि त्यावर सरकारचा निर्णय अंतिम असेल.